Choose a track to play
तू फक्त माझं झाड माझ्यावरलं ऊन काढ
तू फक्त माझं झाड माझ्यावरलं ऊन काढ
मी तुझा तारा नाही, मला बघून दिशा ठरव
मी तुझा वारा नाही, भिरभिर माझ्यामध्ये हरव
उधाणलेला समुद्र असेन पण तुझा किनारा नसेन
लाटांवरती स्वार हो, माझ्यावरून पार हो
तुझ्यामध्ये भिजून उभा, तसाच उभा राहीन मग
तू मात्र चालत रहा, तू मात्र पुढेच बघ
अशीच असते गोष्ट खरी, असच असत खर जग
मला तुझा शेवट नाही अस कस म्हणू सांग
मला तुझा शेवट नाही अस कस म्हणू सांग
आठवण, आठवण, आठवण, आठवण आठवणींची लांबच रांग
अशा कितीक गोष्टी आणि अशा कित्येक रांगा
असे कित्येक किनारे आणि अशा कित्येक बागा
मीच माझा तारा तरी मलाच माझी दिशा नाही
मीच माझा तारा तरी मलाच माझी दिशा नाही
मीच माझा वारा आणि भिरभिरणारा पाचोळा ही
उधाणलेला समुद्र मी पण खरच किनारा म्हणजे काय
अजून आहेत माझ्यावरती कितीक ठसे, कित्येक पाय
मी थकून-थकून जातो पायाखालचा रस्ता होतो
मी थकून-थकून जातो पायाखालचा रस्ता होतो
वाटेत एखाद झाड भेटत सावली मधून अंगाला खेटत
पण पुढे प्रवास तसाच असतो, एकच पक्षी उडता दिसतो
चोचीमध्ये गाण असत, पंखावर ऊन नसत
फक्त काळजावरल्या खुणा सांगत राहतात पुन्हा-पुन्हा
ते फक्त तुझं झाड तुझ्यावरलं ऊन काढ
तू फक्त माझं झाड माझ्यावरलं ऊन काढ
तू फक्त माझं झाड माझ्यावरलं ऊन काढ