Choose a track to play
तुला आळवीता जीवन सरावे
तुला आळवीता जीवन सरावे
अनंता तुझे रूप नेत्री भरावे
तुला आळवीता जीवन सरावे
तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती
तुला अर्पितो ही पुजा भक्तीभावे
तुला आळवीता जीवन सरावे
तुझ्यावीण अम्हां नसे कोण त्राता
अनाथास तू नाथ तू विघ्नहर्ता
तुला संकटी मी सदाही स्मरावे
तुला आळवीता जीवन सरावे
आ जगन्नायका रे नको अंत पाहू
जगन्नायका रे नको अंत पाहू
मना मोही माया किती काळ साहू
निराकार हे रूप साकार व्हावे
तुला आळवीता जीवन सरावे