Choose a track to play
Single / Track
नाही म्हणावयाला आता असे करूया
प्राणात चंद्र घेऊ हाती उन्हे धरूया
नेले जरी घराला वाहून पावसाने
डोळ्यातल्या घनांना हासून आवरूया
हे स्पर्श रेशमी अन हे श्वास रेशमाचे
ये आज रेशमाने रेशीम कातरूया
आता परस्परांची चाहूल घेत राहू
आता परस्परांच्या स्वप्नात बावरूया