Elige una pista para reproducir
देवाघरच्या फुला सोनुल्या देवाघरच्या फुला
देवाघरच्या फुला सोनुल्या देवाघरच्या फुला
अपुले मंगल सांगत नाते
अपुले मंगल सांगत नाते
बाळ घरी हे रांगत येते
बाळ घरी हे रांगत येते
आनंदाने हसत खेळतो झुलवित वारा झुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
देवाघरच्या फुला सोनुल्या देवाघरच्या फुला
दुडुदुडु धावत हसे चिमुकला असा जिवाचा माझा छकुला
दुडुदुडु धावत हसे चिमुकला असा जिवाचा माझा छकुला
अवतीभवती सुगंध सुंदर हाक घालितो तुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
देवाघरच्या फुला सोनुल्या देवाघरच्या फुला
मायपित्याने तुला सोडिले
मायपित्याने तुला सोडिले
हृदयाने मम जवळ घेतले
हृदयाने मम जवळ घेतले
भाग्यवान मी अमोल ठेवा असा लाभला मला
सोनुल्या देवाघरच्या फुला
देवाघरच्या फुला सोनुल्या देवाघरच्या फुला