मना गांव मना देस ... खांदेश
गाडी देस,
पण पैसा ना देस
हो रे, पैसा ना देस!
शे मी मालेगांव ना पोर्या,
पैसा ओढाले वापरतस खोर्या
करत नाही मी तुनासारखा चोऱ्या,
इमानदारी नी व्हस मना मोऱ्या!
तगडा गडी मी रांगड़ा,
अन पिक घेतस चांगड़ा!
डालिंब ना मना मळा शेतस,
सोनानी भरेल गळा शेतस!
वावरात फिराले ट्रॅक्टर शेतस,
बाहेर फिराले हेलिकॉप्टर शेतस!
तू फक्त "हो" म्हण, फिराडी दयू तुलें
आम्ही खानदेशी शेतस!
आमण्या पोरी पण लई भारी,
लागत नाही आमले मुंबई-वारी!
नेसाले तयार एका पायावर
त्या लगनानी साडी,
त्यासना नावावर करिदू वाडी!
पाणी असू दे कमी
अन उकाडा असू दे किती पण जास्त...
काळ्या माटीना वावर मा
झोपस मी बिनधास्त!
मले खावाले लागस वांग्यान भरित,
पोहे खास - मी मिसळ तरित!
भाकरी वर मिर्ची ना ठेचा,
करस मी बेसन पिठल ना लोचा!
डिढ शाना कुनी वना तर
त्याले देतस फाइट!
वातावरण करतस
फुल टू टाइट!
होऊ दे अवस्था त्यानी वाइट -
खांदेश्या रागाचा
नाई कुणाला राइट!
मन एक आइकी घे...
पैसा फुगट देत नाही कुनाले...
किती भी आले अन म्हसनात गेले
जगाले इथे मेहनत लागस!
रोजना कष्टावर आमन भागस!
काम कर बनू नको भैसा,
अरे बात बात ले काय मागस पैसा ?
तूण इथ काय शे? अन वना तू कुठून ?
सावरी घे स्वतःले...देऊ तुले कुटून
कारण हाइ आहे
मना गांव, मना देस - खांदेश!
गाडी देस,
पण पैसा ना देस!!