साज सोन्याचा हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई
बंध न्यारा हा कळेना तुजला
उभी बाजूला मी सावरून स्वप्ने सारी
होऊ दे जीव जरा कावरा बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा
साज सोन्याचा हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई
जोडला कुणी दुवा रेशमी धागा नवा
हा जीवनाचा हात हाती बिलगला
वाट हि वेगळी देउनी जाते मनाला
छंद वेडा ना तुला कळला
होऊ दे जीव जरा कावरा बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा
साज सोन्याचा हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई
बंध न्यारा हा कळेना तुजला
उभी बाजूला मी सावरून स्वप्ने सारी