Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
गुनगुन गुनगुन गुन गातंय का मन
सनसन सन सननन करतंय तनमन
उड उड उडतंय गं उडतंय गं
बावळं संगं संगं वार्याशी सलगी
करतंय का मन
झुरझुर झुरतंय गं झुरतंय गं
सांगना संगं संगं माझ्या तुझंही असंच
करतंय का मन
सजने, सांगना
स्वप्नाच्या मागं
पळ पळ पळताना
मनाची लय, उराचा ताल पार बदलून जातो
रंगतो असा जिवाचा खेळ…
गुनगुन गुनगुन गुन गातंय का मन
सनसन सन सननन करतंय तनमन…
गातंय का मन
सनसन सन सननन
सनई घुमली दारी
हां लगीन घटिका आली
खुलली लाली गाली
हां लगीन घटिका आली
उरात झुळुका, जिवात गलका
मनात गं नवलाई
नव्हाळ हुरहुर, मधाळ काहुर
जोडी जमली
मोहाच्या फुलानं सजलंय सारं जिनं
झुलतंय बेहोशीनं काळीज गं खुळं
भेटीच्या ओढीनं मन झालंया दीवानं
गोंदलं पंखानं आभाळ ह्ये निळं
सांजंला गाभुळत्या
मन भिरभिर भिर भिरभिरतंय
सतरंगी स्वप्नानं
कसं रंगतंय ह्ये येडं
कसली ही माया कसली जादूगरी गं
काळीज ठेका धरी तालावरी गं
नुसत्या या सपनानं खरं खरं सांगना तुझं
भरतंय का मन
गुनगुन गुनगुन गुन गातंय का मन
सनसन सन सननन करतंय तनमन
सनई घुमली दारी
हां लगीन घटिका आली
खुलली लाली गाली
हां लगीन घटिका आली