Elige una pista para reproducir

कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी माझ्या नंतर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन श्वासानी थांबून जावे
अवचित कधी सामोरे यावे
अन श्वासानी थांबून जावे
परस्परांना त्रास तरीही परस्परांना त्रास तरीही
परस्परांविण ना गत्यंतर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
मला पाहुनी दडते लपते
आणिक तरीही इतुके जपते
मला पाहुनी दडते लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या वाटेवरच्या फुलास माझ्या
लावून जाते हळूच अत्तर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
भेट जरी ना या जन्मातून
भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन् तुला तोलुनी धरतो मी अन्
तूही मजला सावर सावर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप झरते तिकडे पाणी टपटप
अन् इकडे ही शाई झरझर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी माझ्या नंतर
कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
किती शहाणे अपुले अंतर
किती शहाणे अपुले अंतर