Elige una pista para reproducir
झाली पहाट झाली पहाट
झाली पहाट झाली पहाट
विरे काळोखाचा वेढा
चांद वळला वाकडा
वाजे राउळी चौघडा वाजे राउळी चौघडा
डुले दारीचा केवडा हो
डुले दारीचा केवडा
भवती जंगल दाट दाट
झाली पहाट झाली पहाट
साद घालितो कोंबडा
उठा नयन उघडा
पहा उजळल्या कडा पडे प्राजक्ताचा सडा हो
पडे प्राजक्ताचा सडा
खचली पाऊलवाट वाट वाट
झाली पहाट झाली पहाट
घरघर घरोघरी
सूर मंजुळ लहरी
तरंगत वाऱ्यावरी जाती पहिल्या प्रहरी
गाती सृष्टीचे भाट भाट
झाली पहाट झाली पहाट
हो हो जाता गुंजती गौळणी
हो हो मंद पैंजणपावलीं
कटि कुंभ आंदोलती कटि कुंभ आंदोलती
गानी गुंग भृंगावली
गानी गुंग भृंगावली
बोले पाणियाचा घाट घाट
झाली पहाट झाली पहाट
झोपडीत मायलेकी हो मायलेकी
हो हो हो झोपडीत मायलेकी
दळताती सासूसूना
तुझे पाऊल पड़ूं दे अंगणांत नारायणा
उजळीत पुढली वाट वाट
झाली पहाट झाली पहाट
झाली पहाट झाली पहाट