Elige una pista para reproducir
जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते
थांबतो थोडा प्रवासी वाट कुठली थांबते
जीवनाची वाट वेडी
आसवांसाठीच डोळे पापण्यांचे रांजण
आसवांसाठीच डोळे पापण्यांचे रांजण
हुंदक्यांचा हक्क येथे हासण्यावरी बंधन
हासण्यावरी बंधन
एकटे बिन-चेहऱ्याचे दैव केवळ हासते
जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते
थांबतो थोडा प्रवासी वाट कुठली थांबते
जीवनाची वाट वेडी
भोवताली दिसती जे जे ते सुखाचे सोबती
भोवताली दिसती जे जे ते सुखाचे सोबती
जीवनी कोणी न साथी जीवनी कोणी न साथी
कोण धावे संकटी
मरण घेऊन रूप गोंडस जगून पुन्हा पाहते
जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते
थांबतो थोडा प्रवासी वाट कुठली थांबते
जीवनाची वाट वेडी