Elige una pista para reproducir
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेती नेती शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली कैचा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अन्त
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव
दत्त येऊनियां ऊभा ठाकला
साष्टांग नमन प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपलें मन झालें उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव