Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
नादखुळा माझा अन खुळीच ती
मी येगळा असा निराळीच ती
आज सपान खरं हे भासतय
मन बेभान होऊन नाचतय...
आलं आभाळ उतरून खाली
मऊ धुक्याची चादर केली
या जीवाची दैना झाली
जवा मैना ही समोर आली...
नादखुळा माझा अन खुळीच ती
आज सपान खरं हे भासतंय
मन बेभान होऊन नाचतंय...
माझ्या जीवाची घालमेल झाली
पोरं घोर ही लावून गेली
जशी प्रेमात चांदणी भिजली
माझ्या मिठीत वात ही थिजली...
नादखुळा माझा अन खुळीच ती
आज सपान खरं हे भासतंय
मन बेभान होऊन नाचतंय...
जवा डोळ्यान डोळ्याला खेटली
माझी तवाच पतंग कटली
माझ्या इश्काची नोट खरी वठली
पिल्लू बाशिंग बांधून नटली...
नादखुळा माझा अन खुळीच ती
आज सपान खरं हे भासतंय
मन बेभान होऊन नाचतंय..."