Elige una pista para reproducir
उन जरा जास्त आहे दर वर्षी वाटत
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत
तरी पौल चालत राहतात, मन चालत नाही
घामा शिवाय शरीरा मध्ये कोणीच बोलत नाही
तीक्यात कुठून एक ढग सूर्या समोर येतो
तीक्यात कुठून एक ढग सूर्या समोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखा खाली घेतो
वारा उनाड मुला सारखा सैरा बैरा पळत राहतो
पाना फुलन वरती छप्रा वरती चढून पाहतो
दुपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्खेहा खेळ
उन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ
चक्क डोळ्यां समोर ऋतु उस बदलून घेतो
पावसान ही ढगान मध्ये कुठून गारवा येतो
गारवा हम्म हम्म हम्म हम्म
गारवा वाऱ्यावर भिरभिर भिरभिर पारवा नवा नवा
प्रिये नभातही नभातही चांदवा नवा नवा
गारवा
गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसरसर काजवा नवा नवा
प्रिये मनातही मनातही काजवा नवा नवा
गारवा
आकाश सारे मांडून तारे आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे मांडून तारे आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा, तुझा जसा गोडवा नवा नवा
गारवा वाऱ्यावर भिरभिरभिर पारवा नवा नवा
प्रिये नभातही चांदवा नवा नवा
गारवा गारवा