Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
नाकात नथनी सोन्याची
पायात पैंजण चांदीचं
नोटावर चितार गांधीचं
नाव नका घेऊ या आंधीचं
मी वादळ वारा वारा वारा
तु पावसाच्या धारा रं...
माझ्या व्हटावर तुझचं नाव रं
मी मस्तानी तु बाजीराव रं
माझ्या काळजात तुझचं नाव रं
तरी देत नाही मला तु भाव रं
चांदीचा छल्ला कमरेला
मारलाय डल्ला ठरलेला
तालुका हाय सारा हललेला
तु हातात हाथ माझा धरलेला
मी वादळ वारा वारा वारा
तु पावसाच्या धारा रं
भल्या भल्यांना पाणी मी पाजणार हाय
हे प्रकरण गावात गाजणार हाय
तुझ्यासाठी मी सजणार धजणार हाय
गाणं माझ्याच एन्ट्रीला वाजणार हाय
नेसून आले मी नऊवारी
काठ हाय पिव्वर जरतारी
मराठी नार मी लय भारी
मागं माझ्याच पब्लिक हाय सारी
मी वादळ वारा वारा वारा
तुझी लाडाची तारा रं
मी वादळ वारा वारा वारा
तु पावसाच्या धारा रं"