Elige una pista para reproducir
आआआआआआ आआआआआआ
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळाच्या रक्षणाला दुर्बळाच्या रक्षणाला
पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो शौर्य लाभो धैर्य लाभो
सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना
भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
आआआआआआ आआआआआआ