Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
जोडूनिया कर चरणी ठेविला माथा
परिसावी विनंती माझी सद्गुरु नाथा
असो नसो भाव आलो तुझिया ठाया
कृपादॄष्टी पाहे मजकडे सदगुरूराया
अखंडित असावे ऐसे वाटते पायी
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई
तुका म्हणे देवा माझी वेडीवाकुडी
नामे भावपाश हाती आपुल्या तोडी