Elige una pista para reproducir
पुन्हा ढग दाटून येतात
पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे
माझ्या मनात भिजून जातात
पुन्हा पाऊस ओला ओला
पुन्हा पाऊस बांधून झुला
तिच्या कडचे उरले झोके
परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो
पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पामधले
तिचे थेम्ब अलगद झेलतो
पुन्हा पावसाला सांगतो मी
पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेम्ब
पुन्हा पावसाला मागतो मी
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
मऊ कापसाने दरी गोठली
मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे
ढगांनी किती खोल उतरायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
घराने मला आज समजावले
घराने मला आज समजावले
भिजूनी घरी रोज परतायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
तुझी आसवे पाझरु लागता
तुझी आसवे पाझरु लागता
खऱ्या पावसाने कुठे जायचे
खऱ्या पावसाने कुठे जायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे