Elige una pista para reproducir
आपण मराठी भाषिक आहोत याचा अभिमान वाटावा
अशा जगा वेगळ्या उत्तुंग कल्पना आपल्या कवितांमधनं देणारे
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या अमर कवितांपैकी एक कविता म्हणजे
पृथ्वीचे प्रेमगीत दाहक सूर्यात केवळ त्यांनाच
पृथ्वीचा प्रियकर प्रत्यक्ष दिसू शकतो
आणि चंद्र शुक्र मंगळ धूमकेतू उभी करतात
आकाशाच्या रंगमंचावर अदभूत प्रेम कहाणी
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना
युगामागुनी चालली रे युगे ही
युगामागुनी चालली रे युगे ही
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना
युगामागुनी चालली रे युगे ही
दिमाखात तारे नटोनी थटोनी
दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतू तुझ्या मूर्तिवाचूनी देवा
परंतू तुझ्या मूर्तिवाचूनी देवा
मला वाटते विश्व अंधारले
युगामागुनी चालली रे युगे ही
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशु
तपाचार स्वीकारूनी दारूण
युगामागुनी चालली रे युगे ही
युगामागुनी चालली रे युगे ही
पिसारा प्रभेचा उभारून दारी
पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना करी याचना प्रीतिची लाजुनी लाल
होऊनिया लाजरा मंगळ लाजरा मंगळ
निराशेत संन्यस्त होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव
पिसाटापरी केस पिंजारूनी हा
पिसाटापरी केस पिंजारूनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव
युगामागुनी चालली रे युगे ही
परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे
तुझी दूरता त्याहुनी साहवे
युगामागुनी चालली रे युगे ही
युगामागुनी चालली रे युगे ही
युगामागुनी चालली रे युगे ही