Elige una pista para reproducir
त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही
असल तुझ गणित खरच मला कळत
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे हिरवळ
पाऊस कपडे ख़राब करतो पाऊस वैतागवाड़ी
पाऊस म्हणजे भीजरी पायवाटपाऊस म्हणजे झाड़ी
पाऊस रेंगाळलेली काम पाऊस म्हणजे सुट्टी उगाच
पावसामधे मध्ये गुपचुप निसटून मन जाऊन बसत ढगात
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होत
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होत
पावसावरुण भांडण होऊन लोकामधे हस होत
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसा सकट आवडावी ती म्हणून तिहि झगड़ते
रुसून मग ती निघुन जाते भीजत राहते पावसात
रुसून मग ती निघुन जाते भीजत राहते पावसात
त्याच तीच भांडण अस ओल्या चिंब पावसात
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले
वार्यातूनी पाण्यातूनी गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा आता ऋतू सजला
वार्यातूनी पाण्यातूनी गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा आता ऋतू सजला
गंध असे मंद जणू होऊनिया थेंब जणू आता टपटपले
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले
पाऊस हा असा झाला वेडापिसा पानाफुलांत पुन्हा
पाऊस हा असा झाला वेडापिसा पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले
काही कळया काही फूले काही झूले हलले
काही मनी काही तनी काही नवे फुलले
काही कळया काही फूले काही झूले हलले
काही मनी काही तनी काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी सावरुनी आज कुणी येथे थरथरले
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले