Elige una pista para reproducir
नाते सलते का
मन हे जुळते का
जरा जरा फुलताना
पाकळी खुलताना
जरा जरा फुलताना
पाकळी खुलताना
रंग बदलते का
हे नाते सलते का
रंग बदलते का
हे नाते सलते का
कधी कधी भास ते
आहे कुणी आपल्या उरी
अन कधी वाटते
नाही कुणी भरल्या घरी
अन कधी वाटते
नाही कुणी भरल्या घरी
हात हाती असुनी
हात हाती असुनी
सावली दूर जाते
कोण जाणे कशाला
ह्यास म्हणतात नाते
येणे कोणाचे
गाणे मौनाचे
मनोमनी स्मरताना
सूरही विरताना
मनोमनी स्मरताना
सूरही विरताना
ताल विरतात का
दिशांतून उलते का
रंग बदलतो का
हे नाते सलते का
डोळ्यात दाटे पाणी
पाण्यानी भिजती डोळे
आभाळ मिरवी का रे
तारे नाभाचे जाळे
नात्यास विनती धागे
धाग्यात फिरती नाते
सलतात रेशीमगाठी
त्यांचीच नक्षी होते
नाते सलते का
मन हे जुळते का
जरा जरा फुलताना
पाकळी खुलताना
जरा जरा फुलताना
पाकळी खुलताना
रंग बदलते का
हे नाते सलते का
रंग बदलते का
हे नाते सलते का