Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
वाट सुगंधी झाली, पायी फुले उमलली
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
पंढरी घावली मला पंढरी घावली
पंढरी घावली मला पंढरी घावली...
चंद्रभागेच्या तीरी, हरिहराची नगरी
लागला त्याचा लळा अन गळाभेट झाली
तो भक्तीचा भुकेला तोच कृपेची सावली
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
पंढरी घावली मला पंढरी घावली
पंढरी घावली मला पंढरी घावली...
विठ्ठलाचा ध्यास उरी, आस दर्शनाची मनी
श्वास विठ्ठल विठ्ठल नामी काया ही रमली
गळा शोभे तुळशीमाळ, अष्ठगंध शोभे भाळी
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
पंढरी घावली मला पंढरी घावली...
पंढरी घावली मला पंढरी घावली...
पुण्यवान झाला देह स्वर्गवाट पंढरीची
भक्त सुखावला आज अशी भेट माऊलीची
हाती माझ्यारे टाळ मुखी नाम हे माऊली
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
रुख्मिणी वर विठ्ठलाची पंढरी घावली
पंढरी घावली मला पंढरी घावली
पंढरी घावली मला पंढरी घावली..."