Elige una pista para reproducir
काळजाची तार ऐसी छेडूनी जाऊ नको
काळजाची तार ऐसी छेडूनी जाऊ नको
गीत माझे प्रीत ल्याले मोडूनी जाऊ नको
काळजाची तार ऐसी छेडूनी जाऊ नको
प्रीत भरल्या लोचनांनी एकदा तू पाहिले
प्रीत भरल्या लोचनांनी एकदा तू पाहिले
मी तुझ्या गे, पापण्यांचे धुंद गाणे गायिले
सूर सारे दर्द वेडे खोडूनी जाऊ नको
गीत माझे प्रीत ल्याले मोडूनी जाऊ नको
काळजाची तार ऐसी छेडूनी जाऊ नको
रातराणी गंध ल्याली तू तशी फुललीस का?
रातराणी गंध ल्याली तू तशी फुललीस का?
हासण्याचे डंख हळवे मारुनी झुललीस का?
मदिर सारं आठवण, तोडूनी जाऊ नको
गीत माझे प्रीत ल्याले मोडूनी जाऊ नको
काळजाची तार ऐसी छेडूनी जाऊ नको
या गुलाबी मैफिली साऱ्या दवाने न्हाहल्या
या गुलाबी मैफिली साऱ्या दवाने न्हाहल्या
शरबती नजरा तुझ्या, माझ्या जिवाच्या जाहल्या
दुरतेची शाल ऐसी ओढूनी जाऊ नको
गीत माझे प्रीत ल्याले मोडूनी जाऊ नको
काळजाची तार ऐसी छेडूनी जाऊ नको
छेडूनी जाऊ नको, छेडूनी जाऊ नको