Elige una pista para reproducir
जीवाशिवाची बैलजोड लाविल पैजंला आपली कुडं
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
तान्या सर्जाची हं नाम जोडी
तान्या सर्जाची हं नाम जोडी
कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
धरती आभाळाची चाकं
त्याच्या दुनवेची हो गाडी
धरती आभाळाची चाकं
त्याच्या दुनवेची हो गाडी
सुर्व्या चंदराची हो जोडी
सुर्व्या चंदराची हो जोडी
त्याच्या सर्गाची रं माडी सर्गाची माडी
त्याच्या सर्गाची रं माडी सर्गाची माडी
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
सती शंकराची माया
इस्नू लक्षुमीचा राया
सती शंकराची माया
इस्नू लक्षुमीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं
डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा