Sencillo / Pista
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
घाली साद तुला मन घाली
तू ना जरी भवताली रे
सुचव ना तूच उपाय आता
हा हा हा हा हा हा
तू नार सखे सुकुमार
नजरेत तुझ्या तलवार
तु सांग कसा इझणार
हे हे हे हे
जीइइ
तू सांग कसा इझणार उरीचा
धगधगता वणवा
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
कि ती वसंत मनात उमलुन आले
आणि क दरवळले
कधी तुझ्याच सुरात हरवून गेले
काहीच ना कळले
वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी
दाटते प्रीत या गुंतल्या लोचनी
ही साद तुझ्या हृदयाची
हलगीच उरी प्रणयाची
हुरहुर मनी मिलनाची
हे हे हे हे
जीइइ
हुरहुर मनी मिलनाची
दे सखे कौल आता उजवा
झाली रुणझुण ही भवताली
लाज अनावर झाली रे
सुखाला साज नवा चढला
हा आ आ आ आ आ