Elige una pista para reproducir
भक्तासाठी तो जगजेठी...
भक्तासाठी तो जगजेठी उभा विटेवर, विटेवर
धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
आषाढी एकादशी होते भक्तांची दाटी
साधू-संतांच्या बघा तिथं होतात भेटी
(साधू-संतांच्या बघा तिथं होतात भेटी)
घेऊनी आस मोठी देव दर्शनासाठी
वारकरी जमती पहा चंद्रभागेच्या तटी
(वारकरी जमती पहा चंद्रभागेच्या तटी)
तिन्ही जगाचा स्वामी तेथे...
तिन्ही जगाचा स्वामी तेथे नांदे विश्वंभर, विश्वंभर
धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
संसारी १७ नडी, वाट ही नागमोडी
आली ही शुभघडी, शुद्ध कर आपली कुडी
(आली ही शुभघडी, शुद्ध कर आपली कुडी)
मायेची तोडून बेडी नातं देवाशी जोडी
कळेल तिथं तुला प्रभूनामाची गोडी
(कळेल तिथं तुला प्रभूनामाची गोडी)
सांगू मी किती, वर्णू किती...
सांगू मी किती, वर्णू किती महिमा असे थोर, असे थोर
धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
तीर्थ वैकुंठापरी अवतरला भूवरी
भक्तावर छाया धरी, पांडुरंग श्रीहरी
(भक्तावर छाया धरी, पांडुरंग श्रीहरी)
अशी ही खरोखरी देवाची ती पंढरी
कीर्तन चाले सदा तिथं वाळवंटावरी
(कीर्तन चाले सदा तिथं वाळवंटावरी)
होऊनी दंग भक्तासंग...
होऊनी दंग भक्तासंग नाचे तो ईश्वर, ईश्वर
धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
भक्तासाठी तो जगजेठी...
भक्तासाठी तो जगजेठी उभा विटेवर, विटेवर
धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)
(धन्य ते भिमातीर, धन्य ते पंढरपूर)