Elige una pista para reproducir
अनंता तुला कोण पाहूं शके
अनंता तुला कोण पाहूं शके
तुला गातसां वेद झाले मुके
तुला गातसां वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूपतृष्णा मनाला असे
अनंता तुला कोण पाहूं शके
अनंता तुला
तुझा ठाव कोठें कळेना जरी
तुझा ठाव कोठें कळेना जरी
गमे मानसा चातुरी माधुरी
गमे मानसा चातुरी माधुरी
तरूवल्लरींना भुकी मी पुसें
तुम्हां निर्मिता देव कोठें वसे
अनंता तुला कोण पाहूं शके
अनंता तुला
फुलें सृष्टिचीं मानसा रंजिती
फुलें सृष्टिचीं मानसा रंजिती
घरी सोयरीं गुंगविती मती
घरी सोयरीं गुंगविती मती
सुखें भिन्न हीं येथ प्राणी चुके
सुखें भिन्न हीं येथ प्राणी चुके
कुठें चिन्मया ऐक्य लाभूं शके
अनंता तुला कोण पाहूं शके
अनंता तुला
तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला
तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला
कृती गावया रे कळेना मला
कृती गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषूं शके
अनंता तुला कोण पाहूं शके
अनंता तुला
नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं
नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो
अनंता तुला कोण पाहूं शके
तुला गातसां वेद झाले मुके
हे अनंता तुला अनंता तुला अनंता तुला