Elige una pista para reproducir
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही

या जगण्याचे ही करने नक्की काय घाटत नाही
या जगण्याचे ही करने नक्की काय अजुन घाटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
दुखा:वर मी केली अशी मात
हसता हसता दुखून आले दात
दुखा:वर मी केली अशी मात
हसता हसता दुखून आले दात
आरसा म्हणतो हसणाऱ्या बाळा
मी फसत नाही
आरसा म्हणतो हसणाऱ्या बाळा
मी फसत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
माझे जिणें भरभरलेले ढग
पाण्याने या पोटी लागे रग
माझे जिणें भरभरलेले ढग
पाण्याने या पोटी लागे रग
देवाजीची किमया हे पाणी
कधी आटत नाही
देवाजीची किमया हे पाणी
कधी आटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
चालत राहण्यासाठी जो हट्टी
त्याची नेहमी खडड्यांशी गट्टी
चालत राहण्यासाठी जो हट्टी
त्याची नेहमी खडड्यांशी गट्टी
असा मी प्रवासी ज्याला गांव
कधी भेटत नाही
असा मी प्रवासी ज्याला गांव
कधी भेटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
हाती येता कागद लिहितो मी
आपुली आपण टाळी घेतो मी
हाती येता कागद लिहितो मी
आपुली आपण टाळी घेतो मी
शब्दांनी या बेरड होता पान
कधी फाटत नाही
शब्दांनी या बेरड होता पान
कधी फाटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
दुर्दैवाच्या दुर्दैवाने ते
माझ्यारूपे निर्लज्जा भेटे
दुर्दैवाच्या दुर्दैवाने ते
माझ्यारूपे निर्लज्जा भेटे
कानी देते धमक्या ते हजार
मी बधत नाही

असं वाटत नाही