Elige una pista para reproducir

आ आ आ आ आ
तुझ्या मनात तुझ्या मनात
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात
किती जरी आजवर जपलं ग
तुझ्या मनात तुझ्या मनात
कधी न दिला डोळ्याला डोळा
स्वभाव अगदी साधा भोळा
कसा सुचावा भलता चाळा आ आ आ
कसा सुचावा भलता चाळा
परि दैव खुदुखुदु हसलं ग
तुझ्या मनात
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात
कसा धरावा सखे भरवसा
कसा धरावा सखे भरवसा
पळे न कुठवर बाई ग ससा
प्रीत पारधी येईल सहसा आ आ आ
कसं अचुक आ आ
कसं अचुक सावज फसलं ग
तुझ्या मनात
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात
मदनदूत पिटतील डांगोरा
आ आ आ आ आ आ
मदनदूत पिटतील डांगोरा
मनोगते ही सांगती चोरा
मनमोरा नाचसी माजोरा
मनमोरा नाचसी माजोरा
कुणी नव्हेच आ आ आ
कुणी नव्हेच बाई अपलं ग
तुझ्या मनात
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात
आ आ आ आ तुझ्या मनात
तेच नाव ओठांवर यावे
तेच नाव ओठांवर यावे
तेच बोल कानांत घुमावे
तेच बोल ग
तेच बोल कानांत घुमावे
तेच रूप नयनांत भरावे
तेच रूप नयनांत भरावे
ते गुपित ते गुपित अम्हांला कळलं ग
तुझ्या मनात
तुझ्या मनात कुणीतरी लपलं लपलं लपलं
तुझ्या मनात
किती जरी आजवर जपलं ग
तुझ्या मनात
किती जरी आजवर जपलं ग तुझ्या मनात