Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
पाहताची होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
अनाथांच्या नाथ हरी असे दयावंत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राहे पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
पाहुनिया विटेवरी विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत
गुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत