Elige una pista para reproducir
त्या सावळ्या तनूचे
मज लागले पिसे ग
नकळे मनास आता
नकळे मनास आता
या आवरू कसे ग
त्या सावळ्या तनूचे
ये ऐकण्यास जेव्हा
त्याचा सुरेल पावा
ये ऐकण्यास जेव्हा
त्याचा सुरेल पावा
चोहीकडे बघे मी
चोहीकडे बघे मी
परि ना कुठे दिसे ग
त्या सावळ्या तनूचे
हलतो तरूलतात आ आ
हलतो तरूलतात
हा खोडसाळ वात
आलाच वाटते तो
मी सारखी फसे ग
मी सारखी फसे ग
त्या सावळ्या तनूचे
खुपते तनूस शेज
क्षणही न येत नीज
खुपते तनूस शेज
क्षणही न येत नीज
डोळ्यांस तो दिसावा आ आ
डोळ्यांस तो दिसावा
हृदयात जो वसे ग
हृदयात जो वसे ग
हृदयात जो वसे ग
त्या सावळ्या तनूचे
मज लागले पिसे ग