आलशी सांड
घसड़ गांड
काम करा उठा पळा
नाहितर नुसता चुना मळा
गोट्या खाजवा कुणालातरी वाजवा
खायला भाकरी आणि मिरची ठेचा
पुढे जाणाऱ्याची तंगडी खेचा
बायकोला घरकाम स्वतः आराम
पोर मातली रात्री बाटली
इथे नीट रहायचे - राज्य माझे
तू बाहेरचा - आम्ही राजे
बिझनेस हा "घोटाळा"
तुला नोकरीचा कंटाळा
आलशी सांड
चल घसड़ गांड
नवा विचार? ला म्हणतो
'विदेशी हवा'
घरातली म्हातारी मागते दवा
याची पोर घरी उपाशी
साहेबांच्या पार्टीला हा मात्र तुपाशी
आतला सिंह मेला का मारला?
जाग रे मर्दा विसर जात-धर्मा!
बघ समोर धावतोय जग वेगानं
तू बसलाय रस्त्यावर भाषेच्या रागाने
आलशी सांड
चल घसड़ गांड
तुझा एक भाऊ अमेरिकेत शिकतो कोडं
आणि तू इथे लोकांची डोकी फोड
न्हाव्याच्या दुकानात तुझी एट
इंस्टा च्या रील मधे संपतोय नेट
आपलेच ढोल आपलेच झेंडेइतका करतो शोर
पास होत नाही दहावी त्याचे पोरं
बापाला शिव्या
पण शिवरायांचे पाईक?
गल्लीच राजकारण आणि तुझा गल्लीछ्छ माईक
तुझं अस्मितेचं किल्लाप्रेम भारी
एक बियर एक वडापावसाठी ईमान विकतो भिकारी!
आलशी सांड
चल घसड़ गांड
माणूसपण म्हणजे नुसतं ढोल बडवणं नाही
ती आहे जिद्द शिस्त आणि उगमाची साक्षी
जागा हो शिलेदार
या झोपेची मरगळ कर पार
नसल्या जरी हातात तलवारी
बन स्वतःची शौर्याची शिलालेख झळकणारी!
आलशी सांड
चल घसड़ गांड
ठीक आहे जर तू माझे ऐकला
नाहीतर म्हणशील
नडला तर फोडला
अशी वाजवत रहा आपलीच तुतारी
आणि मागेच राहा बनून मुतारी !
आलशी सांड
चल घसड़ गांड