Elige una pista para reproducir
मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले
मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले
भय का वाटे मला सरणाऱ्या लाजेचे
जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का
मन हे
मन हे
तुझपाशी रमते अन भिरभिरते, मन हे
माझी साथ तुझ्यासाठी, जाऊ दूर निळ्या काठी
सळसळत्या श्वासात, थरथरत्या अधरात
मिटलेल्या डोळ्यात हे दिसेल का
मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले
आता काय कुणा सांगू
आता काय कुणा सांगू
माझे रूप कसे पाहू
उठले हे काहूर, पडली का ही भूल
प्रेमाची चाहूल ही असेल का
मन हे तुझपाशी रमते अन भिरभिरते
हरते तन वेडे तुझसाठी घुटमळले
भय का वाटे मला सरणाऱ्या लाजेचे
जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का