Elige una pista para reproducir
माज्या मुखार गर्भच्छाया
माज्या मुखार गर्भच्छाया
कुशीक जाले ओझे
तेव्हा बाय कळून
आयले नशीब माका तुजे
नशीब माका तुजे
फुलून येता चाफेकळी मनाक येता बहर
ओठावयल्या अमृताचे होते बाय जहर
जरीपदर उडून जाता जीव मरता लाजे
जीव मरता लाजे
तेव्हा बाय कळून आयले नशीब माका तुजे
नशीब माका तुजे
देवाची गो नोवरी तिचो पाषाणाचो पती
घर नाही दार नाही संसाराची माती
सोभाग्याचा फास तिच्या गळ्यामधे साजे
गळ्यामधे साजे
तेव्हा बाय कळून आयले नशीब माका तुजे
नशीब माका तुजे