Elige una pista para reproducir

Sencillo / Pista
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
ध्यास एक हृदयी धरुनी ध्यास एक हृदयी धरुनी
स्वप्न रंगवावे स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे
सर्वनाश एकच दिसतो नियम ह्या जगाचा
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
दैव ज्यास लोभे त्याला दैव ज्यास लोभे त्याला
लाभ वैभवाचा लाभ वैभवाचा
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति सारा
खेळ कल्पनेचा खेळ कल्पनेचा
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा