Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
टप टप टप टप थेंब वाजती
टप टप टप टप थेंब वाजती गाणे गातो वारा
विसरा आता पाटी पुस्तक
विसरा आता पाटी पुस्तक मजेत झेला धारा
पाऊस आला रे पाऊस आला
पाऊस आला रे पाऊस आला
टप टप टप टप टप टप टप टप
घराघरावर कौलारावर आले झिमझिम पाणी
घराघरावर कौलारावर आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवीहिरवी गाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवीहिरवी गाणी
अवतीभवती भिजून माती
अवतीभवती भिजून माती सुगंध भरला सारा
विसरा आता पाटी पुस्तक मजेत झेला धारा
पाऊस आला रे पाऊस आला
पाऊस आला रे पाऊस आला
टप टप टप टप टप टप टप टप
काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा
विसरा आता पाटी पुस्तक मजेत झेला धारा
पाऊस आला रे पाऊस आला
पाऊस आला रे पाऊस आला
टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप