Elige una pista para reproducir
निरोप तुमचा आम्ही घेतो
निरोप तुमचा आम्ही घेतो
तुमच्या हाती बंदुक देतो
जखमी बांधव तुम्हां सांगतो
निरोप तुमचा आम्ही घेतो
ऊठ जवाना ऊठ अता तू
अरिसैन्याला ठोकत जा तू
पुढचे पाऊल पुढे टाक तू
पुढचे पाऊल पुढे टाक तू
श्वास अडखळे तरी सांगतो
निरोप तुमचा आम्ही घेतो
सांभाळावे स्वातंत्र्याला
सांभाळावे स्वातंत्र्याला
भारतमाता वदली मजला
त्याच्यासाठी प्राण अर्पिला
त्याच्यासाठी प्राण अर्पिला
आम्ही जातो कंठ दाटतो
निरोप तुमचा आम्ही घेतो
रक्षण करी तू स्वातंत्र्याचे
उन्नत राहो निशाण अमुचे
हीच मनीषा शेवटची रे
हीच मनीषा शेवटची रे
वैभशाली भारत बघतो
वैभशाली भारत बघतो
वैभशाली भारत बघतो