Elige una pista para reproducir
सखी शेजारिणी
सखी शेजारिणी तू हसत रहा हसत रहा
हास्यात पळे गुंफीत रहा
सखी शेजारिणी तू हसत रहा हसत रहा
हास्यात पळे गुंफीत रहा
सखी शेजारिणी
दीर्घ बदामी श्यामल डोळे
एक सांद्रघन स्वप्न पसरले
दीर्घ बदामी श्यामल डोळे
एक सांद्रघन स्वप्न पसरले
धूपछांव मधी यौवन खेळे
धूपछांव मधी यौवन खेळे
तू जीवनस्वप्ने रचित रहा
हास्यात पळे गुंफीत रहा
सखी शेजारिणी
सहज मधुर तू हसता वळुनी
स्मित किरणी धरी क्षितिज तोलुनी
सहज मधुर तू हसता वळुनी
स्मित किरणी धरी क्षितिज तोलुनी
विषाद मनीचा जाय उजळुनी
विषाद मनीचा जाय उजळुनी
तू वीज खिन्न घनी लवत रहा
हास्यात पळे गुंफीत रहा
सखी शेजारिणी
मूक जिथे स्वरगीत होतसे
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
मूक जिथे स्वरगीत होतसे
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
जीवन नाचत गात येतसे
जीवन नाचत गात येतसे
स्मित चाळ त्यास बांधून पहा
हास्यात पळे गुंफीत रहा
सखी शेजारिणी तू हसत रहा हसत रहा
हास्यात पळे गुंफीत रहा
सखी शेजारिणी