Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
बघत राहू दे तुझ्याकडे
बघत राहू दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे, भेट घडे
बघत राहू दे तुझ्याकडे
बघत राहू दे तुझ्याकडे
दुःख न उरले, सरली भीती
अंगां-अंगांतुन भरली प्रीती
दुःख न उरले, सरली भीती
अंगां-अंगांतुन भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे
धुंद गंध हा चहूकडे, चहूकडे
बघत राहू दे तुझ्याकडे
बघत राहू दे तुझ्याकडे
गीत स्फुरे कंठातुन कोमल
गीत स्फुरे कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे
उल्लंघाया उंच कडे, उंच कडे
बघत राहू दे तुझ्याकडे
बघत राहू दे तुझ्याकडे
सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे
हर्षसागरी गगन बुडे, गगन बुडे
बघत राहू दे तुझ्याकडे
बघत राहू दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे, भेट घडे
बघत राहू दे तुझ्याकडे
बघत राहू दे तुझ्याकडे