Elige una pista para reproducir
घर थकलेले संन्यासी
घर थकलेले संन्यासी
हळू-हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते
घर थकलेले संन्यासी
ती नव्हती संध्या मधुरा...
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी...
ढग ओढून संध्येवाणी आभाळ घसरले होते
घर थकलेले संन्यासी
पक्षांची घरटी होती...
पक्षांची घरटी होती ते झाड तोडले कोणी?
ते झाड तोडले कोणी?
एक-एक ओंजळी मागे असतेच झऱ्याचे पाणी
घर थकलेले संन्यासी
मी भिऊन अंधाराला...
मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई
ये हलके-हलके मागे त्या दरीतली वनराई
घर थकलेले संन्यासी
घर थकलेले संन्यासी