Elige una pista para reproducir
मुसळधार पाऊस खिडकित उभी राहुन पहा
बघ माझी आठवण येते का
हाथ लांबव तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिउन टाक बघ माझी आठवण येते का
वाऱ्यानं उडणारे पावसाचे चेहऱ्यावर घे
डोळे मिटून घे तल्लीन हो
नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड
समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच
पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पाया खालून
बघ माझी आठवण येते का
मग चालू लाग पावसाच्या अगणित सुया टोचुन घे
चालत रहा पाऊस थांबे पर्यंत तो थांबणार नाहीच
शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस
पुन्हा त्याच खिडकित ये आता नवऱ्याची वाट बघ
बघ माझी आठवण येते का
दारावर बेल वाजेल दार उघड नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढेल
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण
तू म्हण घर गळतय मग चहा कर तो ही घे
तो उठून पंकज उदास लाविल तू तो बंद कर
किशोरीचं सहिलारे लाव बघ माझी आठवण येते का
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल
म्हणेल तू मला आवडतेस पण तू ही तसंच म्हण
विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल
तो त्या कुशिवर वळेल त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते का
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरु नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशी खाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
दारास भास आता हळुवार पावलांचा
हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला
गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले निथळून साचलेले
तळवा भीजेल आता हळुवार पावलांचा
हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला
झाडावरुन पक्षी सारे उडुन गेले
झाडावरुन पक्षी सारे उडुन गेले
जेव्हा भिजून गेले
जेव्हा भिजुन गेले पंखात नाद त्यांच्या
हळुवार पावलांचा हळुवार पावलांचा
पाऊस दाटलेला
पाउलवाट सारी रात्री भिजुन गेली
पाउलवाट सारी रात्री भिजुन गेली
विसरुन तीच गेली विसरुन तीच गेली
ओला ठसा कुणाच्या हळुवार पावलांचा हळुवार पावलांचा
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
दारास भास आता हळुवार पावलांचा हळुवार पावलांचा
पाऊस दाटलेला