Elige una pista para reproducir
हा प्याला शेवटचा हा प्याला शेवटचा
आता थेंब सुद्धा नको साधा गंध सुद्धा नको
आता थेंब सुद्धा नको साधा गंध सुद्धा नको
आली पेंग दिली गालावर टिचकी
हा प्याला शेवटचा हा प्याला
उजाडले तरी काय उजाड धरती
मावळता दिस येते डोळ्याला भरती
उजाडले तरी काय उजाड धरती
मावळता दिस येते डोळ्याला भरती
भरतीचा चांद माझ्या पेल्यातून झुले
भरतीचा चांद माझ्या पेल्यातून झुले
घोट घोट सवे रात कसनुशी बोले
हा प्याला शेवटचा हा प्याला
कुणी दिला हात कुणी सावरले मला
कोण रागावले कोण घाबरले मला
कुणी दिला हात कुणी सावरले मला
कोण रागावले कोण घाबरले मला
भिऊ नका मनातले बोलणार नाही
भिऊ नका मनातले बोलणार नाही
मला ठाव कुणालाच कळणार नाही
हा प्याला शेवटचा हा प्याला
दिसतात जुने जुने कितीक चेहरे
जुना जुना स्पर्श माझ्या देहात थरारे
दिसतात जुने जुने कितीक चेहरे
जुना जुना स्पर्श माझ्या देहात थरारे
जुने घाव आता पुन्हा नव्याने नको रे
जुने घाव आता पुन्हा नव्याने नको रे
हालचालीवर माझ्या क्षणांचे पहारे
आता हा प्याला शेवटचा हा प्याला
अरे आता नको पाजू मला चढली अफाट
दिसू लागे नजरेच्या पल्याडची वाट
आता नको पाजू मला चढली अफाट
दिसू लागे नजरेच्या पल्याडची वाट
देहा सवे वाटेस त्या जाणे नाही होणे रे
देहा सवे वाटेस त्या जाणे नाही होणे
बहिऱ्याच्या गावी नको म्हणायला गाणे
आता हा प्याला शेवटचा हा प्याला शेवटचा
आता थेंब सुद्धा नको साधा गंध सुद्धा नको
आता थेंब सुद्धा नको साधा गंध सुद्धा नको
आली पेंग दिली गालावर टिचकी