Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊ
हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसा राहू
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू
निरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू