Elige una pista para reproducir
मुका पाऊस बरसावा असे वाटते
तुझा आवाज ऐकावा असे वाटते
कधी धरशील का माझ्यापुढे तू चेहरा
मलाही चंद्र स्पर्शावा असे वाटते
जरा गर्दीत मी आता उभा राहतो
कुणी माणूस थांबावा असे वाटते
मला मी शेवटी कळलो जरी नाही तरी
तुला समजून सांगावा असे वाटते