Elige una pista para reproducir
आज मी आयुष्य माझे
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी आयुष्यात येऊन गेलेली ती
तिच्या वरच्या या ओळी
त्रस्त या जिन्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
त्रस्त या जिन्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
अन नाको म्हटले तरी हि
अन नाको म्हटले तरी हि मी जगाया लागलो
अन नाको म्हटले तरी हि मी जगाया लागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
दाद अनेक स्वरूपात मिळत असते पण
अशी दाद फार भाग्याने मिळते
गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला
गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला
ती लिहाया बैसली
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
आणि आयुष्यातल्या मागण्या कधी संपत नाहीत
ठरवले हे पाहीजे ते पाहीजे ते ही हवे
ठरवले हे पाहीजे ते पाहीजे ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती
शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती
हरवलो
हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो
हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
आणि मला कायम असं वाटत कि
कलाकाराचं ध्येय हे कायम कुठली हि दाद कुठलं हि कौतुक
याच्या पलीकडे उभा असावं त्या संदर्भातल्या या ओळी
मज न आता थोडकी आशा कुणी कीवा म्हणा
मज न आता थोडकी आशा कुणी कीवा म्हणा
आज मी
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो
आणि आयुष्यामध्ये विसंगती कशी आहे बघा
काय हे आयुष्य माझे
काय हे आयुष्य माझे काय हि थट्टा तरी
काय हे आयुष्य माझे काय हि थट्टा तरी
मी मला सोडून
मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो
मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो
आणि शेवटचा शेर आहे
आयुष्यात सुख मिळावं म्हणून
आपण खूप आटा पिटा करतो
या सुखावरचा शेर बघा
मी सुखाला पाळले
मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
एखादा कुत्रा पाळावं तसं
मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले
जे मी जपाया लागलो