Elige una pista para reproducir
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
कुंकू पुसलं पुसलं आता उरल गोंदण
तेच देईन देईन नशीबा आवतन
देव गेले देवाघरी आधी थेईसनी ठेवा
डोळ्यापुढे ह्या ग रडू नको माझ्या जीवा
रडू नको माझ्या जीव तुला रड्याची रे सव
रडू हसावं र जरा त्याला संसाराची चव
जरी तुटल्या बांगड्या मनगटी कर तुत
तुटे मंगयसुतर उरे गळ्याची शपथ
अरे रडत रडता डोळे भरले भरले
आसू सरले सरले आता हुंदके उरले
आसू सरले सरले मला मलेच इसावा
आसू असावं बिगर रडू नको माझ्या जीवा
नका नका आया बाया नका करू माझी किव
झालं माझं समाधान आता माझा मले जीव
आता माझा मले जीव
आता माझा मले जीव
राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मागणं
त्यांत आलं रे नशीब
काय सांगे पंचागन
नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहूं
माझं दैव माझ्या घये
माझ्या दारीं नको येऊ
माझ्या दारीं नको येऊ
माझ्या दारीं नको येऊ