Elige una pista para reproducir
अळे खाली धरती दिस आलाया माथ्यावरती
आल्याड डोंगार पल्याड डोंगार
मधीच ख्वाल ख्वाल दरी
जरा जपून चाल ग पोरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी नं माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी नं माणसा परास मेंढरं बरी
त्याला खायाला दिलं तर खातंय
नाही दिलं तर उपाशी राहतंय
त्याला खायाला दिलं तर खातंय
नाही दिलं तर उपाशी राहतंय
दिलं हाकलून माघारी येतयं
काय बोलत न्हाय काय मागत न्हाय
जिव लावतया मालकावरी
जिव लावतया मालकावरी ग माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी गेली सांगून ज्ञानेश्वरी
न माणसा परास मेंढरं बरी
कसं खेळतया लाडलाड तुला दिसत न्हाई
मला बिलगून बसतंया येड तुला कळत न्हाई
कसं खेळतया लाडलाड तुला दिसत न्हाई
मला बिलगून बसतंया येड तुला कळत न्हाई
माझ्या तोंडाला लावतया तोंड तुला जुळतं न्हायी
किती आंजारलं किती गोंजारल
त्याला उत्तच नाय शीरशिरी
त्याला उत्तच नाय शीरशिरी ग माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरीन गेली सांगून ज्ञानेश्वरी
न माणसा परास मेंढरं बरी
तुला पहिल्याच फटक्यात हेरलंय ठेव ध्यानात गं
तवा पासून टकुरं फिरलंय सांगू कानात गं
तुला पहिल्याच फटक्यात हेरलंय ठेव ध्यानात गं
तवा पासून टकुरं फिरलंय सांगू कानात गं
मोठ्या हिंमतीन आज धरलंय आडरानात गं
जीव लावून अशी म्होरं जातीस कशी
ववि गातुया म्यां धनगरी
ववि गातुया म्यां धनगरी माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरीन गेली सांगून ज्ञानेश्वरी
न माणसा परास मेंढरं बरी