Elige una pista para reproducir

आसवात भिजलं रान, वणवा उरी पेटला
मांडूनिया का पुन्हा हा डाव रे मोडला
सुटली का साथ रे, भिजली का आस रे
नाही थारा या जीवा आता (जीवा आता)
का फितूर झाली प्रीत ही? प्रीत ही?
का रे दूर झाली वाट ही?
का फितूर झाली प्रीत ही? प्रीत ही?
का रे दूर झाली वाट ही? (वाट ही?)
ओढ-ताण या जीवाची संपेना
काळजाची साद वेडी ऐकना
रित हि प्रेमाची का वेगळी
सांग किती सोसणार यातना
सुख आता ना दिसे, सावरावे मी कसे?
धागे तुटले कसे सांगना?
नाही थारा या जीवा आता (जीवा आता)
का फितूर झाली प्रीत ही? प्रीत ही?
का रे दूर झाली वाट ही?
का फितूर झाली प्रीत ही? प्रीत ही?
का रे दूर झाली वाट ही?
प्रेम केले, झाला हाच रे गुन्हा
गुंतणे नको आता रे ते पुन्हा
चालताना ठेस का लागली?
नको मला घाव तो आता पुन्हा
समजावू मी कसे? मन हे वेडेपिसे
विसरू तुला कसे सांगना?
नाही थारा या जीवा आता
का फितूर झाली प्रीत ही? प्रीत ही?
का रे दूर झाली वाट ही?
का फितूर झाली प्रीत ही? प्रीत ही?
का रे दूर झाली वाट ही?