Elige una pista para reproducir
जा बाळे जा सुखे सासरी
जा बाळे जा सुखे सासरी
नको गुंतवू मन माहेरी
जा बाळे जा
भाग्यवती तू मुली खरोखर
लाखामधले एक मिळे घर
पणावाचुनी पूर्ण स्वयंवर
पुरुषार्थाची होसी सहचरी
जा बाळे जा
शब्दांवाचून असते भाषा
जाण पतीचे भाव मनीषा
शब्दांवाचून असते भाषा
जाण पतीचे भाव मनीषा
सखी सचिव तू होई शिष्या
वडील गुरुंची करी चाकरी
जा बाळे जा
तुझा लाडका अल्लड वावर
आता कुठुनी माझ्या घरभर
द्राक्षरसाचा मधूर तुझा स्वर
पडेल कानी कुठुनी दिनभरी
जा बाळे जा सुखे सासरी
नको गुंतवू मन माहेरी
जा बाळे जा