Elige una pista para reproducir

Sencillo / Pista
नेऊ नको माधवा अक्रुरा नेऊ नको माधवा
क्रुर अक्रुरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा
नेऊ नको माधवा
खेळगडी तो गोपाळांचा
गिरीधारी रे भक्तजनांचा
तारी गोकुळ कान्हा आमचा
तारी गोकुळ कान्हा आमचा
सर्व सुखाचा अमोल ठेवा
नेऊ नको माधवा अक्रुरा नेऊ नको माधवा
कुंजवनी रे रास रंगली
तालावरती टिपरी घुमली
धुंद रात्र रे स्वप्नी उरली
ऐकू दे मज मंजुळ पावा
नेऊ नको माधवा अक्रुरा नेऊ नको माधवा
नकोस नेऊ बाल मुकुंदा
वेडी होइल गौळण राधा
तुला विनविती नंद यशोदा
तुला विनविती नंद यशोदा
नेऊ नको माधवा
नेऊ नको माधवा अक्रुरा नेऊ नको माधवा
क्रुर अक्रुरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा
नेऊ नको माधवा अक्रुरा नेऊ नको माधवा