Elige una pista para reproducir
आई तुझी झी आठवण येते
आई तुझी झी आठवण येते ये ये ये
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते
माझे काळीज का जळते माझे काळीज का जळते
आई तुझी झी झी आठवण येते
वात्सल्याचा कुठें उमाळा तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी नयनीं दाटून येते ये ये ये नयनीं दाटून येते
आई तुझी झी आठवण येते
आई तुझ्याविण जगीं एकटा पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं काळीज तिळतिळ तुटतें
माझे काळीज तिळतिळ तुटतें
आई तुझी झी आठवण येते
हांक मारितो आई आई हांक मारितो आई आई हांक मारितो आई आई चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली का नच कानीं येते आई का नच कानीं येते
आई तुझी झी आठवण येते आई तुझी आठवण येते